‘मशिदीवर अरबी आणि फारसी भाषेत ‘अल्ला’ लिहिण्यात आले होते !’ -सुन्नी वक्फ बोर्डाचे अधिवक्ता राजीव धवन यांचा हास्यास्पद युक्तीवाद

नवी दिल्ली – अयोध्येतील रामजन्मभूमीविषयी सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या नियमित सुनावणीच्या वेळी २० सप्टेंबरला सुन्नी वक्फ बोर्डाचे अधिवक्ता राजीव धवन यांनी ‘बाबरनामा’च्या विविध आवृत्ती आणि भाषांतर यांचा काही भाग वाचून दाखवला. त्याद्वारे त्यांनी बाबरी मशिदीवर अरबी आणि फारशी भाषेत ‘अल्ला’ लिहिण्यात आले होते आणि त्यामुळे ती मशीद बाबरनेच बनवली, असा दावा केला.

अधिवक्ता धवन यांनी म्हटले की, जन्मभूमी एक ‘न्यायिक व्यक्ती’ आहे. यामागे एकच कारण आहे की, ही भूमी अन्यत्र कुठेही स्थानांतरित करता येऊ शकणार नाही. भगवान विष्णु स्वयंभू आहेत आणि याचे पुरावे आहेत. भगवान राम हेही स्वयंभू असल्याचा युक्तीवाद करण्यात येत आहे.

यासाठी रात्री कोणाच्या तरी स्वप्नात भगवान राम आले आणि त्यांनी त्या व्यक्तीला त्यांचे जन्मस्थान कुठे आहे, हे सांगितले, असा दावा केला जात आहे. अशा दाव्यांवर कसा विश्‍वास ठेवला जाऊ शकतो ?, असा प्रश्‍न धवन यांनी विचारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *