प्रियांका चोप्रा चं दिल धडकलं रोहिंग्यांसाठी ; नेटकरी म्हणाले,’किती मुलं दत्तक घेणार? निकाह करणार का?’

मुंबई: अभिनेत्री आणि युनिसेफची सदिच्छा दूत प्रियांका चोप्राने नुकतीच बांगलादेशमधील रोहिंग्या निर्वासितांच्या शिबीराला भेट दिली. या भेटीचा फोटो प्रियांकाने इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. ‘मी रोहिंग्ये निर्वासितांच्या शिबीरांना भेट देत आहेत. जगाला यांची ( रोहिंग्ये) काळजी करण्याची गरज आहे. आपल्याला यांची काळजी करण्याची गरज आहे. माझे अनुभव वाचण्यासाठी इन्स्टाग्रामवर फॉलो करा.’असे कॅप्शन प्रियांकाने या फोटोला दिले होते.


रोहिंग्ये निर्वासितांबद्दल प्रियांकाला आलेला कळवळा काही जणांना आवडला नाही. त्यामुळे नेटकरांनी तिच्या या दौऱ्याबद्दल जोरदार नाराजी व्यक्त करत तिला ट्रोल केले आहे.


‘दातृत्वाची सुरुवात घरातून होती. प्रियांका तू किती रोहिंग्यांच्या मुलांना दत्तक घेतले आहेस? असा प्रश्न एकाने विचारला आहे. तर प्रियांकाने रोहिंग्ये निर्वासितांशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांना मदत करण्याची हीच एकमेव पद्धत आहे, असे ट्विट अन्य एका ट्रोलरने केले आहे.

प्रियांका चोप्राचा हा दौरा म्हणजे राजकीय स्टंट आहे, असे ट्विट एका युझरने केले असून. ‘हिंदुस्थानात अगदी मुंबईतही अशा प्रकारच्या समस्या असताना तू त्यांच्यासाठी काय केलेस?’असा प्रश्न एकाने विचारला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *