‘सुदर्शन’ दणका.. मुंबई लोकलचे ‘धर्मांध चोर स्टंटबाज’ जेरबंद..

मुंबई:मध्य रेल्वेच्या हार्बर लाईनवर जीवघेणे स्टंट करणाऱ्यांचे वृत्त ‘सुदर्शन’ ने प्रसारीत केले होते, ज्याची गंभीर दखल घेत वडाळा लोहमार्ग पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. मोहम्मद अली समिर अली शेख उर्फ मम्मा (१९वर्ष), शेहबाज मोहम्मद साबेद खान (१९वर्ष), रोहित गजानन चौरसीया (२०वर्ष), मोहम्मद जैयिद शेख उर्फ जावेद (२०वर्ष), अशी त्यांची नावं आहेत. जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अजित बारटक्के यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या ४ पैकी ३ आरोपी हे कुर्ल्याच्या कसाईवाडा येथील रहिवासी,तर एक मुंब्र्याचा रहिवासी आहे. त्यांच्याकडून रेल्वे प्रवाशाचा चोरलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

रविवारी दुपारी या तरुणांनी चुनाभट्टी ते जीटीबी नगर स्थानकातून लोकल ट्रेन बाहेर पडताच स्टंट करायला सुरुवात केली होती. या तरुणांनीच स्टंट करतानाचा व्हिडीओ चित्रीत केला होता. यातील एका टवाळखोराने प्लॅटफॉर्मवर एका प्रवाश्याचा मोबाईल देखील चोरला होता. हा व्हिडीओ व्हायरल होताच सामान्य प्रवासी या टवाळखोरांना आवरणार कोण असा प्रश्न विचारायला लागले होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *