स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक लिखाण केल्याप्रकरणी मुंबई पोलीस करणार अन्वेषण

मुंबई – काँग्रेसच्या अधिकृत ‘ट्विटर’ खात्यावरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक लिखाण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून अन्वेषण करण्यात येणार आहे.

याविषयी सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजीत सावरकर यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात भोईवाडा येथील मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयात खटला प्रविष्ट केला होता. हे प्रकरण भोईवाडा न्यायालयाने दादर पोलीस ठाण्याकडे अन्वेषणासाठी सोपवले आहे. दादर पोलीस ठाण्याचे पोलीस याविषयी अन्वेषण करून भोईवाडा न्यायालयाला अहवाल सादर करणार आहेत. पोलिसांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर भोईवाडा न्यायालयाकडून पुढील कार्यवाही होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *