मुंबई – ईदनिमित्त मुंबईत मोठ्या प्रमाणात बकर्यांची कत्तल केली जाते. त्यासाठी देवनारच्या पशूवधगृहात मोठ्या संख्येने बकर्यांची आयात केली जाते. असे असतांनाही पशूवधगृहाबाहेर बकर्या कापण्यासाठी ऑनलाइन अनुमती देण्याच्या संदर्भात मुंबई महापालिकेने विज्ञापन प्रसिद्ध केले आहे.
पालिकेकडून देण्यात येणारी ही अनुमती पशू कायद्याच्या विरोधात आहे. पशूवधगृहाबाहेर कत्तलीसाठी अनुमती देण्यात येऊ नये, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात एका संस्थेने केली आहे. या प्रकरणी लक्ष घालून उत्तर देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत.