मराठीला अभिजात भाषेच्या दर्जासाठी पंतप्रधानांना पत्र पाठवण्याचे आवाहन

मुंबई – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी मराठीप्रेमी नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहावे, असे आवाहन मराठी एकीकरण समितीने केले आहे.

२०१४ मध्ये साहित्य अकादमीने मान्य करूनही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याविषयीची अनुमती केंद्र सरकारकडून अद्याप मिळालेली नाही. या विषयात वैयक्तिक लक्ष घालून १२ कोटी लोकांची मातृभाषा आणि अनुमाने २ सहस्र वर्षांपूर्वीच्या स्वयंभू मराठी भाषेला तातडीने अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

मोदी यांना पाठवण्यात येणार्‍या पत्रामध्ये म्हटले आहे की, २०१२ पासून महाराष्ट्र राज्य मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी पाठपुरावा करत आहे. महाराष्ट्र सरकारने २०१३ मध्ये केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे अहवाल पाठवला होता. तो त्यांनी साहित्य अकादमीकडे निर्णयासाठी पाठवला होता.

या पत्रात केवळ प्रत्येकाने आपले नाव नोंदवून पंतप्रधान कार्यालयाला पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *