मुंबईतील विमानतळांच्या नावांत ‘महाराज’ ही उपाधी न लावल्यास आमरण उपोषण…

मुंबई – अंधेरी येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि विलेपार्ले येथील छत्रपती शिवाजी आंतरदेशीय विमानतळ या दोन्ही विमानतळांच्या नावांमध्ये ‘महाराज’ ही उपाधी लावून त्यांचे नामकरण अनुक्रमे ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरदेशीय विमानतळ’, असे करण्यात यावे अशी मागणी ‘वॉच डॉग फाऊंडेशन’च्या वतीने करण्यात येत आहे. ‘येत्या ८ दिवसांत वरीलप्रमाणे नामकरण न केल्यास आमरण उपोषण करू’, अशी चेतावणी ‘वॉच डॉग फाऊंडेशन’ या संस्थेकडून देण्यात आली आली. 

या विमानतळांच्या नावांमध्ये ‘महाराज’ ही उपाधी लावण्याचा प्रस्ताव मागील अनेक वर्षांपासून केंद्र सरकारच्या विमान उड्डाण मंत्रालयाकडे पडून असून याविषयी अद्याप अध्यादेश काढण्यात आलेला नाही. मागील २८ वर्षे या विमानतळाच्या नामकरणासाठी अधिवक्ता ग्राडफे पिमेटा, निकलोस अल्मेडा यांसमवेत सहार गावातील शिवप्रेमी लढा देत आहेत; मात्र ‘महाराज’ हा चार अक्षरी खूप महत्त्वाचा असलेला शब्द देण्याची इच्छा सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांना होत नाही, अशी खंत ‘वॉच डॉग फाऊंडेशन’द्वारे व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *