एल्फिन्स्टन आता ‘प्रभादेवी’.. इंग्रजांच्या नावावरून दिलेली इतर स्थानकांचीही नावे बदलावीत..

मुंबई: पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नाव आजपासून प्रभादेवी स्थानक म्हणून प्रत्यक्षात रेल्वेच्या दैनंदिन व्यवहारात वापरले जाणार आहे. या स्थानकाचे नाव एल्फिन्स्टन रोडऐवजी ‘प्रभादेवी’ करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली होती.

पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नाव प्रभादेवी करण्याचे परिपत्रक पश्चिम रेल्वे प्रशासनाने गेल्या वर्षी काढले होते. मुंबई प्रेसिडन्सीचे १८५३ ते १८६० दरम्यान गर्व्हनर असलेल्या लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या नावावरून या स्थानकाचे नाव एल्फिन्स्टन रोड ठेवण्यात आले होते. प्रभादेवी या पुरातन देवीच्या मंदिरावरून या परिसरास प्रभादेवी म्हटले जाते. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी संसदेत एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नाव प्रभादेवी ठेवण्याची मागणी केली होती. इंग्रजांच्या नावावरून दिलेली इतर स्थानकांचीही नावे बदलावीत, अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *