नवी मुंबईत बांगलादेशी घुसखोरांची नाकाबंदी करण्यासाठी ताबा छावणी

मुंबई – मुंबईसह भिवंडी, मुंब्रा, मीरारोड, टिटवाळा अशा विविध ठिकाणी असलेल्या बांगलादेशी घुसखोरांची नाकाबंदी करण्यासाठी येथील नेरूळमध्ये ‘ताबा छावणी’ उभारण्यात येणार आहे. केंद्र शासनाने प्रत्येक राज्यात घुसखोरांसाठी ताबा छावणी उभारण्याचे घोषित केले आहे. ताबा छावण्यांमध्ये घुसखोरांना कुटुंबियांसमवेत ठेवण्यात येणार आहे. येथे लहान मुलांसाठी शिशुगृहही चालवण्यात येणार आहे.

आतापर्यंत उघडकीस आलेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. तस्करी, वेश्याव्यवसाय, मद्यालये आदी गुन्ह्यांमध्ये बांगलादेशी घुसखोर सक्रीय आहेत. देशात आसामसारख्या भागात लाखोंच्या संख्येने घुसखोरी होत आहे. मुंबईसह आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घुसखोर अवैधपणे वास्तव्य करत आहेत; मात्र गृहखात्याकडे यासंदर्भात निश्‍चित आकडेवारी नाही.

नवी मुंबईच्या संदर्भातील ‘डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट’ (डिपीआर्) सिद्ध करण्याचे कामही चालू आहे. यासाठी गृहखात्याने सिडकोकडे ३ एकर भूखंडाची मागणी केली असून सध्या हा भूखंड एका स्वयंसेवी संस्थेकडे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *