‘फटका’ टोळीतील धर्मांधांच्या उपद्रवामुळे मुंबईकर त्रस्त

मुंबई – लोकलच्या दारात उभे राहून गर्दीचा अपलाभ घेत फटके मारून भ्रमणभाष आणि पाकीट आदी मौल्यवान वस्तूंची चोरी करणारी ‘फटका’ टोळी मुंबई आणि उपनगरे येथे कार्यरत झाली आहे. या टोळीत धर्मांधांचाच अधिक समावेश आहे. टोळीच्या उपद्रवामुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. १९ ते २४ सप्टेंबर या काळात टोळ्यांनी केलेल्या उपद्रवात ७ प्रवासी घायाळ झाले. टिळकनगर रेल्वे स्थानकातून या टोळीतील गफूराज खान, रईस अहमद खान, शब्बीर सलीम शेख या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सीएस्टीसह दादर, कुर्ला, ठाणे आणि वडाळा या अतीसंवेदनशील ठिकाणी अशा घटनांना आळा बसण्यासाठी मुंबई रेल्वेने ‘शून्य फटका’ मोहिमेअंतर्गत ‘स्पेशल १५०’ हे पथक नियुक्त केले होते; मात्र ही मोहीम पूर्ण अपयशी ठरल्याचे मागील काही घटनांवरून लक्षात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *