वाजपेयीजींना श्रद्धांजली वाहण्यास MIM नगरसेवकाचा विरोध.. शिवसेना-भाजपने मिळून धु.. धु.. धुतले.

संभाजीनगर: हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव संभाजीनगर महापालिकेत आणण्यात आला होता. त्याला एआयएमच्या एका नगरसेवकाने विरोध केला. यावर शिवसेनेचे आणि भाजपचे नगरसेवक भडकले आणि त्याला धु धु धुतले. दरम्यान, या घटनेनंतर एमआयएम नगरसेवक समर्थकांचा हैदोस, भाजप संघटनमंत्र्याची गाडी फोडली.

संभाजीनगर महापालिकेत आज सर्वसाधारण सभेत स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवसेनचे राजू वैद्य यांनी प्रस्ताव मांडला. मात्र त्याला एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन याने विरोध केला. यावर शिवसेनेचे नगरसेवक संतापले. त्यांनी त्याच्याविरोधात आवाज चढवला. भाजप नगरसेवकही त्यांच्यासोबत जोडले गेले. शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी त्याला धु.. धु.. धुतले. त्यामुळे काही काळ सभेत गोंधळाचे वातावरण होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *