नाशिक महापालिकेकडून पू. भिडेगुरुजी यांच्याविरुद्ध न्यायालयात तक्रार.. धारकऱ्यांमध्ये संताप..

नाशिक – येथे झालेल्या सभेत आंब्याविषयी केलेल्या विधानामुळे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात तक्रार प्रविष्ट केली आहे. १० जून या दिवशी नाशिकमध्ये श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या सभेत आंब्याविषयी पू. गुरुजी यांनी वक्तव्य केले होते. या संदर्भात पुणे येथील आरोग्य उपसंचालकांच्या आदेशानुसार महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. या विभागाच्या अंतर्गत असलेल्या पीसीपीएन्डीटी सल्लागार समितीची बैठक पार पडली.

त्यात पू. भिडेगुरुजी यांच्या वक्तव्याचे चलचित्र बघून चौकशी केली असता समितीला पू. भिडेगुरुजी दोषी आढळले होते; मात्र पू. गुरुजी यांनी या संदर्भात नोटीस स्वीकारली नव्हती. या संदर्भात पुन्हा समितीची बैठक वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराम कोठारी आणि डॉ. प्रशांत थेटे यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी पुढील कार्यवाही करण्याचे ठरवण्यात आले.
पू. गुरुजी यांचे वक्तव्य गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवड प्रतिबंध) अधिनियम २००३ अंतर्गत कलम २२ चे उल्लंघन असल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांकडे तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *