भारतमातेचा संसार चालवण्यासाठी श्री दुर्गामातेजवळ शक्ती मागूया ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

सांगली– छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामध्ये स्वराज्य, स्वधर्म यांच्यासाठी कृती करण्याचे विलक्षण कर्तृत्व आहे. या कर्तृत्वाचे स्मरण करून हिंदुस्थान एकछत्री अंमलखाली येऊ दे, तसेच भारतमातेचा संसार चालवण्यासाठी श्री दुर्गामातेजवळ शक्ती मागूया, असे मनोगत श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी व्यक्त केले. ते श्री दुर्गामाता दौडीच्या पहिल्या दिवशी माधवनगर रस्त्यावर असलेल्या श्री दुर्गामाता मंदिरासमोर बोलत होते.

प्रथम मारुति मंदिरासमोर असलेल्या शिवतीर्थावर सगळे धारकरी एकत्र आले. तिथे सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौर सौ. संगीता खोत यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. यानंतर सर्व धारकरी धावत माधवनगर रस्त्यावरील श्री दुर्गादेवीच्या मंदिराकडे गेले. येथे श्री गणेश आणि श्री दुर्गादेवी यांची आरती करण्यात आली. यानंतर पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे मार्गदर्शन झाले. यानंतर शहरातील विविध मार्गांवरून जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ दौडीचा समारोप झाला. दौडीत महापौर सौ. संगीता खोत यांनीही काही काळ भगवा झेंडा हातात घेतला होता. याप्रसंगी धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *