धर्मांध प्रियकराला भुलून हिंदु मुलीने स्वतःच्याच घरात केली चोरी !

मुंबई – कांदिवली येथील राधा गुप्ता या केवळ १९ वर्षीय मुलीने आमिर नौशाद खान या तिच्या धर्मांध प्रियकराने फूस लावल्यामुळे त्याला देण्यासाठी स्वतःच्याच घरातून १० लाख रुपये चोरले.

कलिना या भागात लपून बसलेल्या आमिर खान याच्यासमवेत तिला पोलिसांनी अटक केली. पैसे घेऊन त्याने तिला पळवून नेले होते. पालकांनी पोलिसांत तक्रार केल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

त्याला व्यवसाय चालू करायचा असल्याने पैसे चोरल्याचे तिने पोलिसांजवळ सांगितले. न्यायालयाने त्यांना १ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *