नाशिकमध्ये वाराणसीच्या धर्तीवर गोदाआरतीला प्रारंभ

नाशिक – वाराणसीच्या धर्तीवर येथेही गोदावरीच्या आरतीला आरंभ करण्यात आला. गोदावरी नदीच्या काठावर रामकुंडावर राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल, तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

आरतीसाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने निधी संमत केला असून आगामी शंभर दिवस व्यय संमत पैशातून केला जाणार आहे. दैनंदिन सायंकाळी ७ वाजता रामकुंडावर गोदा आरती करण्यात येणार आहे, असे रावल यांनी सांगितले. गोदाआरती यापुढे अखंड चालू राहील. आरतीमध्ये खंड पडणार नाही, असे महाजन यांनी सांगितले.

गेल्या मासात गोदा आरती आरंभ करण्याविषयी पुरोहित संघाची बैठक झाली. त्यात आरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या वेळी आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, खासदार उन्मेष पाटील, लक्ष्मण सावजी, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *