पोलिसांनी केलेल्या कारवाईचा आम्ही निषेध करतो – प्रकाश  आंबेडकर

 

हैद्राबाद हत्याकांड प्रकरणातील चारही आरोपींच एन्काऊंटर झाल्यानंतर देशभारातुन वेगवेगळ्या प्रकिया उमटत आहेत. कोणी याच समर्थन करत आहे तर कोणी निषेध करत आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे आरोपी होते त्या सर्वाना गोळ्या घालण्यात आल्या . पोलिसांनी केलेल्या कारवाईचा आम्ही निषेध करतो अस त्यांनी म्हटल आहे.पोलिसांची ही कारवाई बेकायदेशीर असल्याचही त्यांनी यावेळी म्हटल आहे. रेड्डी या महिलेवर झालेला अत्याचार निंदनीय आहे. सर्व देशाने याची निंदा केली असुन यासाठी न्याय मागितला आहे.पोलीसांनी या आरोपींना कोर्टासमोर घेऊन जायच होत असेही त्यानी यावेळी म्हटल आहे. कोर्टाने न्याय देणे गरजेचे आहे मात्र पोलीसच न्याय करायला लागले तर कोर्टावर कोणाचा विश्वास राहणार नाही. उद्दा कोणीही पोलीसांना सुपारी देईल आणि संपवेल याचाही विचार व्यवस्थेने केला पाहीजे असेही त्यांनी म्हटल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *