महाविकासआघाडीचा तिढा सुटला सोमवारी मंत्र्याची शपथविधी.?

शिवसेना ,कॉग्रेस आणी राष्ट्रवादीच्या सरकारमधील खातेवाटपाचा तिढा अखेर सुटला असल्याच माहीती सुत्रांनी दिलीय. महाविकासआघाडीचा नेत्यांन मध्ये खातेवाटपाबाबत एकमत झाले आहे. येत्या 9 डिंसेबरला राज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराची  शक्यता आहे. त्यानंतर राजभवनावर शपथविधी होणार असल्याची माहीती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.

महाविकासआघाडीच सरकार स्थापन झाल्यानंतर अजुन मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नाही . त्याबद्दल मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यात बैठक पार पाडली. या बैठकीत 6 मत्र्यांना तृर्तास  खातेवाटप होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ऊद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊऩ  9 दिवस झाले मात्र अजुनही खातेवाटप  जाहिर झाले नसल्याने कॉग्रेस आणी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये नाराजी असल्याच बोलल जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्यात शुक्रवारी चार्चा झाली आहे. मुंबईतील नेहरु सेंटर मध्ये ही चर्चा झाली . या चर्चेत राष्ट्रावादीकडुन जयंत पाटील  आणि अजित पवार सहभागी झाले तर शिवसेनेकडुन एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई सहभागी झाले होते. यावेळी खातेवाटपाबाबत दिरगांई नको .खातेवाटप लवकर जाहीर करावे अशी भुमिका शरद पवारांनी माडल्यांची माहीती सुत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *