वंदे मातरम्’ गीत म्हणण्यावर कमलनाथ सरकारची बंदी.

मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकारमधील कर्मचाऱ्यांना वंदे मातरम् गीत म्हणण्यावर घातली बंदी
– मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकारमधील कर्मचाऱ्यांना वंदे मातरम् गीत म्हणण्यावर बंदी घातली आहे. कमलनाथ सरकारनं हा निर्णय घेतला आहे. राज्य सचिवालयाबाहेर दर महिन्याच्या पहिल्या तारखेला काम सुरू करण्याच्या आधी वंदे मातरम् म्हणण्याची पद्धत होती. परंतु काँग्रेस सरकारनं ती पद्धत मोडीत काढली .कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले की, वंदे मातरम् म्हणण्यापेक्षा जनतेच्या कल्याणाची कामं करण्यावर लक्ष्य केंद्रित करा.

कमलनाथ सरकारच्या राज्यात कर्मचाऱ्यांना वंदे मातरम् बोलण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळेच दर महिन्याच्या पहिल्या तारखेला भोपाळमध्ये होणाऱ्या वंदे मातरमचं गीत गायन 1 जानेवारी 2019 रोजी झालेलं नाही. परंतु तत्पूर्वीच्या सरकारमध्ये हे दर महिन्याच्या पहिल्या तारखेला नित्य नियमानं होत होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *