“कारगिल विजय दिन” ..त्या शहीद जवानाच्या नावे १९ वर्षांपासून तेवते आहे अखंड ज्योत!

नवी दिल्ली:  भारतीय जवानांचे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अनन्य साधारण महत्त्व आहे. ते सीमेवर उभे आहेत म्हणून आपण मोकळा श्वास घेऊ शकतो. शत्रूचे आक्रमण रोखण्यासाठी ते कायमच सज्ज असतात. कारगिलच्या युद्धाची आठवण म्हणून आणि भारतीय सैनिकांनी मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून २६ जुलैला विजय दिवस साजरा होतो. याच विजय दिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला कहाणी सांगतो आहोत अशा एका जवानाची जो या युद्धात शहीद झाला, मात्र त्याच्या नावे १९ वर्षांपासून एक अखंड ज्योत तेवते आहे.
ही कहाणी आहे शहीद सतवंत सिंग यांची. त्यांची आठवण आली की आजही त्यांच्या आई वडिलांचे डोळे पाणवतात. वयाच्या २१ व्या वर्षी सतवंत सिंग यांना कारगिल युद्धात वीरमरण आले. टायगर हिल्सवर विजय मिळवताना सतवंत सिंग देशासाठी शहीद झाले. सुखदेव कौर आणि कश्मीर सिंग ही त्यांची आई वडिलांची नावे आहेत.
मुलाच्या आठवणी जागवताना या दोघांचेही डोळे भरून येतात. त्याच्या आठवणीत आजही या कुटुंबाकडून एक ज्योत तेवत ठेवण्यात आली आहे. सतवंत सिंग यांना कारगिल युद्धा दरम्यान मामून कँट या ठिकाणी धाडण्यात आले होते. या युनिटने जी संयुक्त मोहीम त्या मोहिमेत अनेक पाक सैनिक मारले गेले. यानंतर टायगर हिल्सजवळ मोहिम सुरु असताना सतवंत सिंग यांना वीरमरण आले.
शहीद सतवंत सिंग याना ‘सुदर्शन मराठी’ ची विशेष आदरांजली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *