आशियातील नोबेल पुरस्कार समजला जाणारा रेमन मॅग्सेस पुरस्कार यंदा दोन भारतीयांना..

मनिला: आशियातील नोबेल पुरस्कार समजला जाणारा रेमन मॅग्सेस पुरस्कार यंदा दोन भारतीयांना जाहीर झाला आहे. प्रसिद्ध अभियंते सोनम वांगचुक आणि डॉ. भरत वाटवाणी यांना २०१८साठीचा रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.

भरत वाटवाणी यांनी भारतातील हजारो मनोरुग्ण मुलांना मानसिक आधार दिला आहे. या मुलांना त्यांनी नवं जीवदान दिल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

तर निसर्ग, संस्कृती आणि शिक्षण या क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल सोनम वांगचुक यांना रेमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांनी लडाखमधल्या दुर्गम भागात भरीव योगदान दिलं आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *