सीमेवर पुन्हा ड्रॅगनची घुसखोरी.. जवानांनी मानवी साखळी ने हुसकावले सीमापार..

सिक्किम: डोकलाम वादाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर चिनी ड्रॅगन पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. सिक्किम येथील हिंदुस्थानची सीमारेषा ओलांडून नाकू या भागात ५० चीनी सैनिक दोन किलोमीटर आत घुसल्याचे समोर आले आहे. मात्र, जवानांनी मानवी साखळी करुन त्यांना अक्षरश: सीमापार हुसकावले.

यावेळी दोन्ही सैन्य आमने सामनेही आले. पण ढाल बनून उभे राहिलेल्या जवानांपुढे चिनी सैनिक हतबल झाले आणि आल्या वाटेने परतले. तब्बल चार तास चिनी सैनिक नाकूत तळ ठोकून होते. जवानांनी त्यांना परत जाण्यास सांगितले. पण हा आमचाच प्रांत असल्याचे सांगत त्यांनी तिथून जाण्यास नकार दिला. त्यानंतर १०० हिंदुस्थानी जवानांच्या फळीने मानवी साखळी तयार केली व त्यांना ढकलतच सीमेपार नेले. यावेळी दोन्ही सैन्यात वादही झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *