हिंदू व्यक्तीने पाकिस्तानात रोवला झेंडा.. ‘हिंदू’उमेदवाराचा पाकिस्तान निवडणूकित विजय..

कराची – मुस्लीमबहुल पाकिस्तानात एका धार्मिक अल्पसंख्यांक नेत्याने बाजी मारली आहे. महेश कुमार मलानी असे या हिंदू धर्मीय नेत्याचे नाव आहे.  पीपीपी  पक्षाकडून सिंध प्रांताच्या थापरकरमधून त्यांनी निवडणूक लढविली.

महेश कुमार यांना यंदाच्या निवडणुकीत 37 हजार 245 मते मिळाली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या उमेदवाराला 18 हजार 323 मते मिळाली.

कोण आहेत महेश कुमार पहा:

मलानी हे पाकिस्तानातील राजस्थानी पुष्कर ब्राम्हण कुंटुंबातील.

२००३-०८ दरम्यान पाकिस्तानी संसदेत नामनिर्देशित सदस्य.

२०१३ मध्ये पाकिस्तानात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मलानी स्थानिक सदनाचे सदस्य म्हणून निवडून आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *