संतश्री आसारामजी बापू यांच्या देश-विदेशातील ४२५ आश्रमांमध्ये गुरुपौर्णिमा साजरी..

कर्णावती (गुजरात) – पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार पूज्यपाद आसारामजी बापू यांच्या देश आणि विदेश येथील ४२५ आश्रमांमध्ये २७ जुलैला गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.

या पत्रकात पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांनी भक्तांना गुरुपौर्णिमेनिमित्त दिलेला संदेशही देण्यात आला आहे. यात पूज्यपाद आसारामजी बापू यांनी म्हटले आहे की, जसे व्यापारी प्रत्येक दिवाळीला त्याच्या व्यापाराचा हिशेब करतो, तसाच गुरुपौर्णिमा ही साधकाचा आध्यात्मिक हिशेब पहाण्याचा दिवस आहे.
गुरुपौर्णिमेचा संदेश आहे की, तुम्ही ईश्‍वराला मिळवण्यासाठी दृढनिश्‍चयी व्हा. आयुष्य न्यून होत आहे, तर कोणतीही गोष्ट उद्यावर का टाकावी ? मृत्यूच्या पूर्वी ‘आत्मा अमर आहे’, याचा साक्षात्कार व्हावा, यासाठीच गुरुपौर्णिमा असते. या जगातील नश्‍वर गोष्टींविषयी जितके प्रेम आहे, त्याच्यापेक्षा अर्धे प्रेम ईश्‍वरावर झाले, तर तुमचे सार्थक होईल. तुमचे दर्शन करणार्‍याचाही पुण्योदय होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *