बलात्काऱ्यांना दंड मिळायलाच हवा, मात्र तो कायद्याने: देवेंद्र फडणवीस

 

तेलंगणा राज्यातील हैदराबादमध्ये वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून जाळून मारणाऱ्या नराधमांचं एन्काऊंटर केल्यामुळे समाज माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी पोलिसांच्या या कृतीचं कौतुक केलंय , तर काहींनी या सगळ्या प्रकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कायद्याचा धाक राहणार नसल्याच म्हंटलय. आता यासंदर्भात राजकीय नेत्यांकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.राज्याचे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही या प्रकारावर भाष्य केलंय. जेवढी माहिती मला मीडियाच्या माध्यमातून मिळालेली आहे. त्यानुसार एन्काऊंटर जे काही झालेलं आहे, त्यासंदर्भात लोकांमध्ये तीव्र भावना पाहायला मिळते. बलात्काऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असं लोकांचं मत आहे. मात्र माझ्याजवळ यासंदर्भातली जास्त माहिती नसल्यामुळे मी अधिक बोलणार नाही,मात्र बलात्काऱ्यांना मृत्युदंड मिळायला हवा आणि तो कायद्यानं मिळावा , असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *