समुद्री चाचांनी केले अठरा भारतीयांचे अपहरण.

 

हॉगकॉगला जाणाऱ्या आठरा भारतीयांचे समुद्री चाचांनी अपहरण केल्याची घटना घडली आहे. सागरी घटनांवर नजर ठेवणाऱ्या एका जागतिक संस्थेने ही माहिती दिली आहे. हे जहाज सुऱक्षित असुन ते नायजेरिया नौदलाच्या देखरेखेखाली  असल्याच सांगण्यात येत आहे. या घटने बाबत सुत्रांनी सांगितले की , भारतीयांचे अपहरण झाल्याच्या  वृतांनतंर नायजेरियातील भारतीय मिशनने या घटनेशी संबधीत आधिक माहिती शोधण्यासाठी आणि  अपहरण केलेल्या भारतीयांना वाचवण्यांसाठी आफ्रिकेतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असल्याच समजत. जहाजाच्या मागोवा घेणाऱ्या  एका संकेतस्थळाने मंगळवारी हे जहाज चाचांनी पकडल्याचे वृत्त दिले आहे.चाचांनी  जहाजातील लोकांचे अपहरण केले. त्यात भारतीय आणी तुर्की नागरिक असल्याच बोलल जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *