विख्यात सेंट झेविअर्स कॉलेजच्या इतिहासात पहिल्यांदाच मराठी आणि ख्रिश्चन नसलेले प्राचार्य नियुक्त..

मुंबई- मुंबईच्या विख्यात सेंट झेविअर्स कॉलेजच्या इतिहासात पहिल्यांदाच मराठी आणि ख्रिश्चन नसलेल्या व्यक्तीची प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजेंद्र शिंदे असं त्यांच नाव असून शिंदे हे झेविअर्सच्या बॉटनी विभागाचे प्रमुख आहेत. गेल्या 35 वर्षांपासून ते कॉलेजमध्ये प्राध्यापक असून ते या कॉलेजचे 24 वे प्राचार्य आहे. शिंदे हे 1 सप्टेंबरपासून आपला कार्यभार स्वीकारतील.

सेंट झेविअर्सचा सर्व कारभार हा ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून चालवला जातो. अशाच प्रकारे दिल्ली,चेन्नई आणि कोलकत्यालाही ख्रिश्नच कॉलेजेस असून तिथे अजुनही ख्रिश्चनेतर प्राचार्यांची नियुक्ती झाली नाही. या कॉलेजेसच्या प्राचार्य पदावर ख्रश्चन व्यक्तिंनाच प्राधान्य दिलं जातं.

1980 मध्ये त्यांनी या कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला होता.सेंट झिविअर्स कॉलेजचा मुंबईत दबदबा असून तिथे प्रवेश घेण्यासाठी विद्यांर्थ्यांमध्ये चढाओढ असते. उत्तम दर्जा, शिस्त, सतत नाविण्याचा ध्यास आणि विद्यार्थी प्रिय धोरण यासाठी हे कॉलेज ओळखलं जातं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *