मुस्लिम विद्यार्थ्याने गुरू पौर्णिमेनिमित्त शिक्षकांना केले वंदन.. मुस्लिम संगठनांचा तीळ पापड..

तिरुवअनंतपुरम: केरळमध्ये त्रिशूर येथे एका शाळेत गुरू पौर्णिमेचा उत्स्व वादात सापडला आहे. त्रिशूरच्या सीएनएन गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल या संस्थेत शिक्षकांच्या सन्मानासाठी गुरू पौर्णिमेचा उत्सव साजरा केला गेला. २७ जुलै रोजी या कार्यक्रमात काही मुस्लिम विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले, त्या फोटोत काही मुस्लिम विद्यार्थी आपल्या शिक्षकांना वंदन करताना दिसत आहे. पण भारतीय मुस्लिम लीगच्या विद्यार्थी संघटनेने या कार्यक्रमाला विरोध दर्शवला असून राज्याच्या शिक्षणा मंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.

भारतीय मुस्लिम लीगचे महासचिव पी.के. फिरोज म्हणाले की “विशिष्ट धर्माच्या लोकांना दुसर्‍या धर्मातील प्रथा पार पाडण्यासाथी प्रवृत्त करणे हे त्यांच्या व्यक्तिगत अधिकाराचे उल्लंघन आहे”. काँगेस आमदार बलराम यांनीही या कार्यक्रमावर टीका केली असून, याबाबत शाळेचे अधिकारी दोषी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच फेसबुकवर त्यांनी केलेल्या पोस्ट मध्ये म्हणाले “की शिक्षक हे ज्ञानदानाचे काम मोफत करत नसून त्यांना त्याचा पागार मिळतो, एका चांगल्या शिक्षकाची प्रशंसा करणे चुकीचे नाही, पण पाया पडणे आणि शिक्षकांसमोर विद्यार्थ्यांना झुकायला लावणे ही बाब पूर्णतः चुकीची आहे.”
शाळेचे व्यवस्थापक ई बालगोपालन यांनी वरील सर्व आरोपांचे खंडन केले, तसेच विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी प्रवृत्त केले नसल्याचेही नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *