‘संतापजनक’-कॉन्वेन्ट स्कुल बनताहेत ख्रिस्तीकरनाचे अड्डे.. पडद्याआडुन हिंदु मुलांवर ख्रिश्चन संस्कृती लादण्याचा धक्कादायक प्रकार..

नगर :शहरातील अनेंक कॉन्व्हेंट स्कुलमध्ये शिक्षणाच्या आडुन ख्रिश्चन धर्माचा प्रचार केला जात असल्याचे समोर आले आहे.

मुलांना भारतीय संस्कृतीपासुन दुर करुन ख्रिश्चन संस्कृती लादन्याचे प्रयत्न केले जात आहेत असा आरोप महाराष्ट नवनिर्मान सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केलाय.काही शाळांमध्ये हिंदु देवीदेवता यांची तुलना येसु ख्रिस्ताशी करुन येशु हिंदु देवतांपेक्षा कसा महान आहे असे मुलांच्या मनावर बिंबवले जात आहे.यामुळे अनेक मुलांनी या शाळांमधुन अर्ध्यावरच आपले दाखले काढुन घेउन दुसरीकडे प्रवेश घेतला असल्याची माहीती त्यांनी दिली.

या प्रकाराविरोधात मनसे ने शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनी कुठलीही कठोर कारवाई केली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान या संदर्भात शिक्षनअधिकारी लक्ष्मन पोले यांच्याशी संपर्क साधला असता ‘ आम्ही संबंधीत शाळांना नोटीसा पाठविल्या आहेत ‘ असे सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *