मौलवी की देशद्रोही?? झेंडावंदनानंतर राष्ट्रगीत गाण्यास मौलवीचा नकार..तिघांना अटक..

महाराजगंज: बुधवारी 15 ऑगस्टला हिंदुस्थानचा 72 वा स्वातंत्र्या दिन सर्वत्र उत्साहात साजरा झाला. देशभर देशभक्तीपर गाणे, विविध कार्यक्रम आणि झेंडावंदन करून स्वातंत्र्या दिन साजरा झाला. परंतु उत्तर प्रदेशमधील महाराजगंजमध्ये एक संतापजनक प्रकार घडला.

येथील एका मदरशामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा तर फडकवला गेला परंतु मौलवीने मदरशातील मुलांना आणि शिक्षकांना राष्ट्रगीत गाण्यास मज्जाव केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानतंर या आधारे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मोहम्मद जुनैद अन्सारी, मोहम्मद अझलूर रेहमान आणि मोहम्मद निजाम अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *