शिवशाहिरांच्या शिवसृष्टीला केंद्र सरकारचे ५ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य

पुणे – महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुढाकारातून साकारण्यात येणार्‍या शिवसृष्टीसाठी केंद्र सरकारच्या वतीने ५ कोटींचे अर्थसाहाय्य घोषित करण्यात आले आहे. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १२ मे या दिवशी विभागीय कार्यालयात होणार्‍या कार्यक्रमात बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे धनादेश सुपुर्द करणार आहेत. कात्रज-आंबेगाव परिसरात २१ एकर भूमीवर ही शिवसृष्टी साकारण्यात येत असून वर्ष २००२ पासून त्याचे काम चालू आहे. राज्य सरकारच्या पर्यटन खात्याने या शिवसृष्टीला विशेष प्रकल्प म्हणून मान्यता दिली आहे. ‘शिवसृष्टीचे एक तृतीयांश काम पूर्ण झाले असून यामध्ये शिवचरित्राचा इतिहास आणि अभ्यास यांचा अविष्कार पहायला मिळेल’, असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले.

‘बी’ग्रेडच्या लोकांचा थयथयाट !
सरकारच्या अर्थसाहाय्यामुळे ‘बी’ग्रेडच्या लोकांचे पित्त खवळले असून ‘आम्ही मेलो, तरी बेहत्तर; पण हा कार्यक्रम होऊ देणार नाही’, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे. राज्य सरकारच्या वतीने चांदणी चौकात शिवसृष्टी उभारण्यात येत आहे. या कामाला सरकार प्राधान्य दिले जात नाही, अशी टीकाही विरोधकांकडून करण्यात येत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *