‘सुदर्शन मराठी ‘ दणका-गावकऱ्यांना मारहाण केलेल्या ‘गोतस्कर टोळी’च्या म्होरक्यांना अखेर अटक.. तपासात हलगर्जीपणी दाखवलेले ११ पोलिसही निलंबीत..

भंडारा : जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील अड्याल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सौदंड गावात ७ जुलैला गोतस्करांकडून सौंदड गावातील लोकांना मारहाण करण्यात आली होती. यादरम्यान झालेल्या वादात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. या प्रकरणी १४ आरोपींची शोध पोलीस घेत होते. यातील ४ आरोपींना पोलिसांनी त्वरित अटक केली होती. पण, या प्रकरणातील मुख्य १० आरोपी फरार होते. 

‘सुदर्शन मराठी’ ने या धटनेचा निषेध करत वृत्त लावून धरले होते.
शिवाय न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन नाकारल्याने स्थानिक गुन्हे शाखा आरोपींच्या मागावर होती. अखेर या दहाही आरोपींना भंडारा शहराच्या बैरागी वार्डातून फोन लोकेशनच्या मदतीने अटक करण्यात आली आहे. विषेश म्हणजे या प्रकरणी पोलीस अधीक्षक वनिता साहू यांनी तपासात हलगर्जी दाखवलेल्या ११ पोलिसांना निलंबीत केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *