अल्पवयीन मुलीशी जबरदस्ती लग्न करून तीचा अमानुष छळ करणाऱ्या धर्मांध पती व सासऱ्याला बेड्या..

मुंबई: मुलगी 15 वर्षांची असतानाही तिच्याशी जबरदस्तीने लग्न करून एक तरुण तिला बंगालहून मुंबईत घेऊन आला. येथे त्याने मुलीचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. सुदैवाने नवरा आणि तिच्या काकांची नजर चुकवून ती घराबाहेर पळाली आणि मुंबई क्राइम ब्रँच युनिट-9 च्या हाती लागली. पोलिसांनी मुलीला नेहमीच्या त्रासातून मुक्त करून तिच्या आयुष्याशी खेळणाऱया तिघांच्या मुसक्या आवळल्या.

बुधवारी दुपारच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी माऊंट मेरी हिल येथे रडत उभी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आशा कोरके यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कोरके, एपीआय शरद दराडे, उपनिरीक्षक वाल्मीक कोरे, हरीश बनसोडे आदींच्या पथकाने लगेच माऊंट मेरीच्या दिशेने धाव घेतली आणि गोंधळलेल्या अवस्थेत रडत उभ्या असलेल्या मुलीला ताब्यात घेतले. तिला युनिटमध्ये आणून चौकशी सुरू केली तेव्हा ती बंगालची असून तिचे साजीद मुस्तफा शेख या तरुणाशी जबरदस्तीने लग्न लावून दिले होते.

त्यानंतर साजीद मला मुंबईला घेऊन आला. येथे आणल्यापासून साजीदने माझा शारीरिक व मानसिक छळ सुरू केल्याचे ती म्हणाली. नेहमीच्या त्याचा जाचाला प्रचंड कंटाळली होती. गुरुवारी संधी साधून पळून आली. मुंबईची काहीच माहिती नाही. त्यामुळे रस्ता दिसेल तशी चालत आल्याचे ती म्हणाली. दरम्यान, वांद्रे पूर्वेकडील निर्मलनगर पोलीस ठाण्यात ती मुलगी हरवल्याची तक्रार देण्यात आल्याचे पथकाला समजले. त्यानंतर कोरके व त्यांच्या पथकाने मुलगी हरवल्याची तक्रार देणारा तिचा पती साजीद आणि तिचा काका तोमेर नौशाद अली शेख या दोघांना अटक करून निर्मलनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.

जन्म दाखल्यात खाडाखोड करून 19 वय दाखवले

पीडित मुलगी 15 वर्षांची आहे, मात्र तिला लग्न करून मुंबईत आणणाऱ्या साजीदने ती हरवल्याची तक्रार देताना तिचे वय 19 वर्षे सांगितले होते. यासाठी त्याने तिच्या जन्म दाखल्यात खाडाखोड केली होती. या कटात साजीदचा बाप मुस्तफा शेख हा देखील सहभागी होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला देखील बेडय़ा ठोकल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *