नक्षलप्रेमींच्या अटकेचा कम्युनिस्ट, तथाकथित विचारवंत व (अ)सामाजिक कार्यकर्ते यांना पोटशूळ !

नवी दिल्ली – पुणे पोलिसांनी २८ ऑगस्ट या दिवशी देशातील ६ राज्यांमध्ये छापे टाकून नक्षलप्रेमींना केलेल्या अटकेच्या कारवाईचा डावे, तथाकथित विचारवंत आणि (अ)सामाजिक कार्यकर्ते यांनी संयुक्त पत्रक काढून निषेध केला आहे. पुण्यातील शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ या दिवशी झालेल्या एल्गार परिषदेच्या (‘एल्गार’ म्हणजे जोराची चढाई किंवा निकराचे आक्रमण) आयोजनामध्ये नक्षलवाद्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुणे पोलिसांनी महाराष्ट्रातील मुंबई आणि ठाणे, तसेच भाग्यनगर, रांची, फरिदाबाद, देहली आणि गोवा येथे छापे टाकून तेलुगू कवी वारावर राव, अरुण परेरा, गौतम नवलखा, वरनॉन गोन्सालवीस आणि सुधा भारद्वाज या नक्षलप्रेमींना अटक केली.

या पत्रकात म्हटले आहे,

१. विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर कारवाई अन्यायकारक अन् राजकीय हेतूने प्रेरित आहे. त्यामागे फार मोठे कारस्थान आहे. या सर्वांवर करण्यात आलेले आरोप मागे घेऊन त्यांची तातडीने सुटका करावी.

२. ही कारवाई म्हणजे वंचितांसाठी आणि न्यायासाठी लढणार्‍या लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

३. अटक केलेले सर्व जण हे सत्ताधारी पक्ष भाजप आणि या पक्षाद्वारे चालवल्या जाणार्‍या सरकारच्या चुकीच्या धोरणांवर सातत्याने टीका करत होते. त्यामुळेच त्यांना ‘शहरी नक्षलवादा’च्या नावाखाली अशा पद्धतीने हेतूपुरस्सर लक्ष्य केले गेले. यामागे मतांचे ध्रुवीकरण करून वर्ष २०१९ मधील निवडणुका जिंकण्याचा डाव आहे.

४. या लोकांवरील कारवाई म्हणजे अग्नीवेश आणि उमर खालिद यांच्यावर नुकत्याच झालेल्या आक्रमणाच्या मालिकेचा भाग आहे. ही एक प्रकारची असहिष्णुताच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *