मुंबई । मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वर रायगड जिल्ह्यातील रसायनीजवळ स्विफ्ट डिझायर कार आणि गॅस टँकरचा भीषण अपघात झाला आहे. त्यात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

साताऱ्यातून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या स्विफ्टनं एका टँकरला मागून जोरदार धडक दिली. त्यात स्विफ्टमधील चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ३ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. मृतांची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. अपघात झाल्यानंतर रोडवेज पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, हायवे पोलीस यंत्रणा, डेल्टा फोर्सचे जवान, रसायनी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना त्वरित पनवेलच्या रुग्णालयात दाखल केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *