जालना । मनसेच्या कार्यकर्त्यांकडून महावितरण कार्यालयाची तोडफोड

जालना । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी जालना जिल्ह्यातील मंठ्यातलं महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात तोडफोड केली. मंठा तालुक्यातील अनेक गावांमध्ये खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न कायम आहे. रोहित्र जळालेले असताना ते दुरूस्त करून दिले जात नाहीत. त्यामुळे अनेक गावे अंधारात असून, शेतकऱ्यांचेही हाल होत आहेत. शहरी, ग्रामीण भागातील वीज पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, मागणीकडे दुर्लक्ष करीत थकीत वीजबिलाच्या वसुलीचे कारण पुढे करीत गावा-गावातील वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. त्यामुळं नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी दुपारी मंठा येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात तोडफोड केली. या प्रकरणी मंठा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *