धर्मांधांकडून कावड यात्रेकरूंना मारहाण.. हिंदुत्वनिष्ठांवर सुलत्नानी पोलिसांचा लाठीमार..

सीकर (राजस्थान) – येथील फतेहपूरमध्ये चुरू मार्गावरील एका मशिदीजवळ कावड यात्रेकरूंना डिजेवर भजन लावल्यावरून वाद झाल्यानंतर धर्मांधांकडून मारहाण करण्यात आली होती. यात ३ कावड यात्रेकरू घायाळ झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तसेच काही धर्मांधांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मारहाणीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि उत्तरदायींना अटक करण्यासाठी दुसर्‍या दिवशी हिंदुत्वनिष्ठांनी येथे आंदोलन केले. त्या वेळी झालेल्या वादानंतर पोलिसांवर दगडफेक करण्याची घटना घडल्याने पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. यात काही जण घायाळ झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *