अल्पवयीन हिंदू मुलीची छेड काढण्याची धर्मांधांची दबंगगिरी.. संतप्त जमावाने चोपले व गाडी जाळली!

जळगाव – शिरसोली येथील किराणा घ्यायला आलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढणार्‍या धर्मांधांस गावातील संतप्त जमावाने चोप दिला. कबीर शेख पिंजारी या प्रौढाने अल्पवयीन हिंदु तरुणीचा हात पकडला, तसेच अन्य काही तरुणही तिला त्रास देत होते. काही हिंदु तरुणांनी त्यांना जाब विचारल्यावर त्यांनी पळ काढला.

त्यानंतर या तरुणीने हे धर्मांध मागील तीन–चार दिवसांपासून त्रास देत असल्याचे सांगितले. या प्रकारामुळे गावात सर्वत्र संतापाची लाट पसरल्याने संतप्त जमावाने धर्मांधांची दुचाकीही जाळून टाकली. या वेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *