‘वासनांध’बाबा आसीफ नुरी अखेर जेरबंद.. पुरूष व महिलांवर करत होता लैंगिक अत्याचार..

परभणी:येथील रहीवासी शे.अलताफ शे.इस्माईल या व्यक्तीच्या तक्रारीवरुन दि. २० जुलै २०१८ रोजी परभणी पोलीसांनी आसीफ नुरी याच्या विरोधात पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली की आसीफ नुरी या भोंदु बाबाने शहरात दर्गाह रोड परिसरात एक धार्मीक स्थळ बनवले असुन त्या ठिकाणी तो आपल्या चेल्यांसोबत धार्मीक प्रवचणे देत असतो. त्याच्यातच त्याचे शेकडो अनुयायी बनले होते या अनुयायांपैकी जो त्याला आवडला त्याला आपल्या संमोहनात घेऊन तुला निवडले गेले आहे असे सांगुन त्याला आपल्या सोबत अनैसर्गीक संबंध करावयास भाग पाडायचा, अशा प्रकारे कित्येक लोकांसोबत त्याने अनैसर्गीक संबंध कायम केले. याचबरोबर लहान मुल व महिलांचेही त्याने लैगीक शोषण केले असल्याचे बोलले जात आहे.

 या प्रकरणाचा उलगडा सोशल मिडीयावर व्यायरल होणा-या एका ध्वनीफितीद्वारे झाला. या ध्वनीफितीत आरोपी भोंदु बाबा व ए का शष्यिाचे संभाषण आहे. या ध्वनीफितीत स्वतः या भोंदु बाबा ने आपन केलेल्या कृत्याबाबत कबुली दिली आहे. ही ध्वनीफित व्हायरल होताच हा भोंदु बाबा आपल्या चेल्यांसह फरार झाला होता. त्याचे संभाषण व फोटो सोशलमिडीयावर व्हायरल झाल्यानंतर लोकांत त्याच्या प्रति मोठ्या प्रमाणावर आक्रोश होता. चिखली येथे परभणी येथील काही लोकांनी त्याला ओळखले व याची माहिती दुरध्वनीद्वारे परभणीचे सामाजीक कार्यकर्ता अब्दुल कादर यांना दिली. अब्दुल कादर यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ परभणी चे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना दिली. पो.नि.अशोक घोरबांड यांच्या माहितीवरुन चिखली पोलीसांनी आसीफ नुरी या भोंदु बाबाला बस स्टॅंड परिसरात त्याच्या वाहनासह अटक करुन परभणी पोलीसांच्या ताब्यात दिले.
भोंदु बाबाची अटक वार्ता चिखली परिसरात वा-यासारखी पसरली असता त्याला पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती. लोकांचा आक्रोश पाहुन चिखली पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी त्याला ताबडतोब परभणी पोलीसांच्या स्वाधीन केले. पुढील कारवाई परभणी पोलीस करणार आहे.
  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *