नागपूर येथून ४ बांगलादेशींना अटक !

नागपूर – येथे अनधिकृतपणे वास्तव्य करणार्‍या रॉकी बरुवा, सुदर्शन बरूवा, विप्लव बरूवा आणि प्रदीप बरूवा या ४ बांगलादेशी नागरिकांना गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांच्या विशेष शाखेने गिट्टीखदान परिसरातून त्यांना अटक केली. हे रोहिंग्या मुसलमान असल्याचा पोलिसांना संशय आहे. 

काही बांगलादेशी शहरात अनधिकृतपणे वास्तव्य करत असल्याची माहिती विशेष शाखेला २ मासांपूर्वी मिळाली होती. त्यानुसार वरील कारवाई करण्यात आली.

पारपत्र, व्हिसा आणि इतर कागदपत्रे नसतांनाही हे ४ जण येथे भाड्याने रहात होते. बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी आपण भारतात आल्याचे ते सांगायचे; मात्र संशयास्पद हालचाली दिसल्याने विशेष शाखेने त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना अटक केली आहे. आरोपी अनेक वर्षांपासून येथे रहात असून त्यांनी खोटे भारतीय रहिवासी प्रमाणपत्र सिद्ध केल्याची माहिती समोर आली आहे. याविषयी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *