मंदसौर प्रकरणातील धर्मांध बलात्काऱ्यांना फाशी.. दोन महिन्यात लावला निकाल..

मंदसौर: मंदसौर येथे एका सात वर्षाच्या मुलीवर दोन नराधमांनी शाळकरी मुलीवर पाशवी बलात्कार करून तिला हाल-हाल करत ठार मारणाऱ्या इरफान आणि आसिफ या दोन्ही आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. केवळ दोन महिन्यांच्या आत पीडितेला न्याय मिळवून दिल्यानं नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. तसेच फाशीची शिक्षा सुनावल्याने असे कृत्य करणाऱ्यांना आळा बसेल असंही मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


अत्यंत क्रूरपणे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला ठार मारणाऱ्या या दोघांना न्यायालयानं सकाळीच दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर दुपारी शिक्षा सुनावण्यात आली. मुलीवर पाशवी बलात्कार करणाऱ्या या नराधमांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयानं या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *