कत्तलीसाठी आणलेल्या १९ गोवंशांची सुटका.. बाबा बंगाली दर्ग्यामागे ठेवलेली लपवून..

नगर: येथे कत्तलीसाठी आणलेल्या १९ जनावरांची पोलिसांनी सुटका केली आहे. मोहसिन कदीर कुरेशी असे आरोपीचे नाव असून तो फरार आहे.

देशभरात गोवंश हत्या बंदी आहे. असे असतानाही मोहसिनने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील बाबा बंगाली दर्ग्यामागे १९ गोवंश जनावरांना बांधून ठेवले होते. मोहसिनने कत्तलीसाठीच ही जनावरे आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
यामुळे पोलिसांनी सापळा रचून तेथे छापा घातला. पोलीस आल्याचे समजताच मोहसिनने तिथून पळ काढला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *