परळीत तालुक्यात खुले आम प्लास्टिकचा खुले आम वापर…

परळी/बीड(सुकेशनी नाईकवाडे):-

महाराष्ट्रात नुकताच प्लास्टिक बंदी कायदा पास झाला असून या कायद्याचे काटेकोर पने पालन करणे अनिर्वार्य करण्यात आले आहे.
या कायद्याचे उल्लंघन केल्यास 5000 नगदी दंड आकारण्यात येतो याचे जिवंत उदाहरण घ्यायचे झाले तर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी स्वतः प्लास्टिक चा कप वापल्याची चूक लक्ष्यात येताच 5000 रुपये दंड भरून या कायद्याचे पालन केल्याचे सर्वांना माहीत आहे.
मात्र परळी शहरात या कायद्याची पायमल्ली होतांना दिसून येत आहे,सर्रास बाजारात, भाजी मार्केट, फ्रुट मार्केट, मटण मार्केट, वैद्यनाथ देवस्थानाच्या परिसरात, बेकरीवाले, मेडिकल वाले, ज्या ज्या ठिकाणी देवाण घेवाम होते त्या सर्वच ठिकाणी या प्लॅस्टिच्या पिशव्या चा वावर केला जात आहे.
कायदा लागू झाल्या बरोबर सुरुवातीला या सर्व प्रकाराला व वापरला आळा बसला होता पण परत आठ दिवसाच्या फरकाने जैसे थे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
जे नागरिक जागरूक आहेत ते प्लास्टिक बंदी मुळे खुश आहेत ते या कायद्यांचे काटेकोर पणे
पालन सुद्धा करत आहेत, पण विक्रेते मात्र या कायद्याला न जुमानता आपला सपाटा सोडण्याचे काही नाव घेत नाहीत.
प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणावर त्यांच्या विपरीत परिणाम हातांना दिसून येत आहे तसेच
पाळीव प्राणी त्याच प्लास्टिक च्या पिशव्या खाऊन अनेक आजारांना बळी पडल्याचे सर्वनाच माहीत आहे. त्याच प्रमाणे माणसांवर त्याचा अत्यंत वाईट परिणाम होतांना दिसून येत आहे, त्यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे, त्वचेचे आजार वाढले आहेत, तसेच रोजच्या खाण्या पिण्याच्या वापरामध्ये प्लस्टिक चा सर्रास वापर वाढला असल्यामुळे देखील अनेक नवीन आजार वाढत जात आहेत .
झपाट्याने वाढत जात असलेल्या प्लॅस्टिकरूपी
विष्याला लवकरात लवकर आळा घालने अत्यंत आवश्यक असल्याचे नागरिकांतून बोलले जत आहे, तसेच पर्यावर्णाचा समतोल राखण्यासाठी याला प्रशासनाने जागरूक राहून या सर्वांवर नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे असल्याचे परळी तालुक्यातील नागरिकांतून बोलले जात आहे.
प्लास्टिकच्या निर्मितीवर जर बंदी घातली तर विक्री सुद्धा होणार नाही असे देखील पर्यावरण प्रेमी मध्ये चर्चा होतांना दिसून येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *