न प सदस्याने केला पदाचा दुरुपयोग, शासन कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष

बुलढाणा ( योगेश शर्मा )

.
नेहमीच विकासकार्याला घेऊन चिखली नगरपालिका चांगलीच चर्चेत असते. सध्या चिखली शहरात चालणाऱ्या विविध रस्त्यांच्या निर्मिती मध्ये शहरवासीयांच्या मनात पाल कुचकूचते आहे, याचे सुद्धा निराकरण लवकरच होऊन कार्य प्रगतीपथावर असणार याची अपेक्षा आहे. परंतु या प्रकारामुळे न.प. प्रशासन व स्थानिक भाजपा मध्ये चांगलेच तणावाचे वातावरण सध्या तरी पहावयास मिळत आहे.
हे वाद संपत नाही तर तेच नगरपालिका चिखली मध्ये नगरपालिकेला अजून एक मोठा धक्का लागण्याची शक्यता आहे. निवडणून आलेल्या न.प.सदस्यावरच चक्क नगरपालिका चिखली व शासनाची फसवणूक करण्याचे आरोप करण्यात आले आहे. आणि मुख्य म्हणजे हे आरोप दुसऱ्या तिसऱ्या कुणाचेही नसून शासकीय राजपत्रित अधिकारी यांच्या पत्रातच झालेल्या उल्लेखात आहे.
जर का हे खरच सत्य असेल तर, नेहमी नव्या नव्या वादामुळे चर्चेत असणारी चिखली नगरपालिका आता या नव्या प्रकरणामुळे जिल्ह्यातच नव्हे तर आता महाराष्ट्रभर चर्चेत येणार, हे मात्र नक्की.
परंतु सध्या तरी या विद्यमान न.प.सदस्या विरुद्ध आरोप सिद्ध झाल्याचे न.प. ने सुद्धा सांगितले, परंतु स्वतः हुन कोणतीही कारवाई आतापर्यंत केल्याचे दिसून येत नसून ते खरच कारवाई करतीलच का.? याबद्दल संदेह निर्माण होत आहे.
खर तर न.प. ची व शासनाची कोणी फसवणूक केलिच असेल तर त्याच्यावर कोणत्या कलमाह्वये गुन्हा दाखल होतो, हे आपणा सर्वांना ज्ञातच आहे. आणि त्यातल्या त्यात जर फसवणूक करणारे न.प.चे विद्यमान सदस्य जर असेल तर त्यांचे सदस्यपद सुद्धा काढून घेऊन फसवणुकीचे गुन्हे दाखल होतात व शिक्षा सुद्धा. आणि चौकशी दरम्यान मंग पुढे एक एक धागा बाहेर येतो आणि शेवटी जबाबदार प्रशासन आपली चोख भूमिका बजावतोच.
परंतु या प्रकरणात दुसरीकडे शासकीय कार्यालयातुन आलेल्या नोटिसीला दिलेल्या उत्तरात न.प.सदस्याने उलटवार करतांना सांगितले आहे की, घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांना काहीच माहीत नव्हते, आम्हाला जर माहीत असते तर आम्ही ही चूक केली नसती. आणि आमच्या कामात आवश्यक ती माहिती न.प. ने सुद्धा आम्हाला दिली नाही. आम्हाला जी माहिती पुरविण्यात आली त्यानुसार आम्ही तर शासन नियमानुसार सर्व प्रक्रिया पार पाडल्यात. म्हणून आमची सनद रद्द न करता कायम करावी. न.प. ने आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती नाही दिली, जी माहिती दिली होती त्यानुसारच आम्ही काम केलेत. न.प.नेच आमची फसगत केल्याचा काहीसा आरोप विद्यमान न.प.सदस्या कडून होतांना या पत्रातून स्पष्ट होत आहे.
परंतु हे कितपत सत्य आहे.? हे लवकरच समोर येणार. एक गोष्ट तर खरी आहे, ती म्हणजे चूक तर झालेली आहेच. आता यात कोण कोण दोषी असणार हे प्रकरणाच्या तपासा अंती कळणारच. आणि घडलेल्या या प्रकारात उडालेला हा गोंधळ नेमका कशामुळे घडला हे सुद्धा माहीती होणारच. किंवा संगनमत करून हा सर्व प्रकरण तयार करून पूर्णत्वास नेला गेला असावा आणि ही शक्यतापण नाकारता येत नाही की, ठरलेल्या देवाणघेवाण च्या वादातून आरोप-प्रत्यारोपाचे बीज आता पेरल्या जात आहे, आणि तुला न मला घाल कुत्र्याला म्हणत आपण केलेल्या चुकांना आता दुरुस्त करत समोर आणत असावे, जेणेकरुन आपली बाजू सेफ..!
परंतु शेवटी म्हणायचे इतकेच की, गोड गैरसमज मध्ये हे सर्वच महाभागांना राहत आहे. परंतु एक जुनी म्हण आहे की, सौ बका, एक लिखा… याची प्रचिती प्रकरणात समिलीत सर्वच लोकांना येणारच हे मात्र एक कटू सत्य आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *