जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड 24 डिंसेबर रोजी.

बीड – संपुर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कार्यकाळ संपणार आहे. याबाबत ग्रामविकास विभागाच्या अप्पर सचिवाने कार्यकाळ संपताच जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि सभापतींच्या निवड करण्याबाबतचा आदेश काढलाय. येत्या २४ डिसेंबर रोजी बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या निवडीसाठी सभेचे आयोजन करणार असल्याची माहीती खात्री लायक सुत्रांनी दिलीय.
बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी आणि भाजप या पक्षात चुरस आहे. सध्या भाजपकडे २६ तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे २३ जिल्हा परिषद सदस्य आहेत. आणि शिवसेनेकडे ४ सदस्य आहेत. तर बाकी सदस्यांची जागा रिक्त आहे. त्यामुळे ५७ सदस्यांच्या द्वारेच ही बीड जिल्हा परिषदेची निवडणुक होणार आहे. बीडचे प्रभारी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी येत्या २४ डिसेंबरचा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा मुहूर्त काढला आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीसाठी सदस्यांची विेशेष सभा बोलवावी लागते. त्या अनुषंगाने बीड जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा परिषद सद्स्यांना या सभेच्या बैठकीसाठी उद्या नोटीस बाहेर पडणार असून येणाऱ्या २४ डिसेंबर रोजी बीड जिल्हा परिषदेचा कारभारी म्हणजे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडी होणार आहे.

अभिमन्यु फड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *