राहाता – जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी राहाता शहरात कडकडीत बंद पाळून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता सर्व नागरिकांच्या वतीने शोकसभा घेण्यात आली आत्मघातकी व अतिरेकी हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त करताना हिंदू-मुस्लीम बांधवांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत अतिरेक्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे असे सांगत या घटनेचा निषेध व्यक्त केला कोणत्याही परिस्थितीत अतिरेकी व पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊन धडा धडा शिकवलाच पाहिजे आपल्या सैनिकाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब सर्व भारतीयांनी घेतला पाहिजे अशी भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली
शहरातील वीरभद्र महाराज मंदिरासमोरील प्रांगणात सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शहरातील नागरिक व्यापारी व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन येथील हल्ल्यात शहीद झालेल्या भारत भूमीच्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध म्हणून राहता शहरात छोट्या-मोठ्या सर्वच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने व व्यवहार दिवसभर बंद ठेवून कडकडीत बंद पाळला वीरभद्र मंदिरासमोर झालेल्या सभेत बोलताना अनेक नागरिकांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवत या भ्याड हल्ल्यात शहीद हुतात्मा पत्करलेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाता कामा नये भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानला आता चांगलाच धडा शिकवण्याची गरज असल्याचे सांगितले यावेळी अनेक नागरिकांनी व्यक्त केली जबरदस्त भारतीय सैन्य दलाने अतिरेक्यांच्या आजवरच्या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊन दहशतवादी व अतिरेकी कारवायांना धडा शिकवला आहे मग तो सर्जिकल स्ट्राइक असो अथवा इतर अन्य मार्गाने असो अनेकांना पळती भुई थोडी केली आहे या पुलवामा येथील अतिरिक्त आत्मघातकी हल्ल्याचाही भारतीय सैन्य चांगला बदला घेतील आपण प्रत्येक भारतीयाने त्यासाठी सज्ज होणे गरजेचे असल्याचे यावेळी अनेकांनी सांगितले या श्रद्धांजली सभेत माजी नगराध्यक्ष कैलासबापु सदाफळ, साहेबराव निधाने,अॅड. भाऊसाहेब सदाफळ , धनंजय गाडेकर, इलियास शाह , जयराज दंडवते, प्रदिप बनसोडे, साहेबराव कुदळे , सुनिल लोंढे , सुमनताई वाबळे , डाॅ.स्वाधीन गाडेकर , रामनाथ सदाफळ , अनिल बोठे , अॅड. रघुनाथ बोठे , मुन्नाभाई शहा , मुश्ताकभाई शाह , मुन्नाभाई (फिटर) सय्यद, साहेबराव कुदळे अॅड. रघुनाथ बोठे ,सुनील लोंढे ,सुमनताई वाबळे रामनाथ सदाफळ ,अनिल बोठे, आदींनी श्रध्दांजली पर मनोगत व्यक्त केले .
सूत्रसंचालन व आयोजन सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी केले .राहता शहरातून सायंकाळी सातच्या सुमारास कँडल मोर्चा काढून युवकांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *