साकुरी येथे मंदिरातील दानपेटी फोडताना चोरांना रंगेहात पकडले

शिर्डी :- शिर्डी पासून जवळ असलेल्या साकुरी येथील श्री उपासनी कन्याकुमारी स्थानातील खंडोबा मंदिरातील दानपेटी फोडताना २ चोरांना रंगेहात पकडले या बाबत संविस्तर माहिती अशी कि वाजण्याच्या सुमारास साकुरी आश्रमात खंडोबा मंदिर आहे या ठिकाणी काल रात्री १०.१५ च्या सुमारास २ चोर हे खंडोबा मंदिरात दानपेटी हि तोडत असताना शेजारील राहणाऱ्या लोकांच्या लक्षात आले .त्यांनी तत्काळ या आश्रम च्या सुरक्षा रक्षका ला कळविले .सुरक्षा रक्षकाने अत्यंत हुशारीने या २ चोरट्यांना दानपेटी फोडताना रंगेहात पकडले . त्यातील १ चोर हा सुरक्षा रक्षकाला हाताला झटका देऊन पळून ज्याण्यात यशस्वी झाला व दुसर्या चोराला पकडून ठेवण्यात सुरक्षा रक्षकाला यश आले . या घटनेची माहिती तत्काळ राहता पोलीस स्टेशन ला फोन वरून दिली असता घटना स्थळी तत्काळ पोलीस दाखल झाले व चोरलेला मुद्देमाल पकडलेल्या आरोपीकडून ताब्यात घेवून संस्थान प्रशासनाच्या ताब्यात दिला व आरोपी ला पोलिसांनी अटक करून पोलीस स्टेशन ला नेले .परंतु १ पकडलेला आरोपी हा अल्पवयीन असल्यामुळे त्यावर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल न करता फक्त समज देऊन सोडून दिले व १ फरार आरोपीचा शोध अद्याप लागला नाही .सदरील अश्या घटना घडण्याचे प्रमाण हे साकुरी गावात वाढले आहे. अश्या प्रकारच्या चोर्या करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा आधार घेतला जात आहे .तरी पोलीस प्रशासनाने अश्या घटनांकडे लक्ष देणे गरजेचे आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *