पिंपरी चिंचवड मधील आदित्य बिर्ला रुग्णालयातील डॉक्टरांनी सर्वात दुर्मिळ अश्या न्युरॉलॉजीकल अशा आजारातून एका 35 वर्षीय व्यक्तीचे प्राण वाचविले आहे पाहुयात कश्या पद्धतीने जीवन वाचवण्यात यश आले आहे

 

35 वर्षीय व्यक्ती हा एक गरीब कुटुंबातील तिल आसुन त्याचा व्यवसाय मेंढपाळ आहे तो शेळ्या मेंढ्या माळरानात चरण्यासाठी घेऊन गेला असतांना त्यास अचानक मोठ्या प्रमाणात डोकेदुखी जाणवायला लागली.त्यांचे जबरदस्त डोके दुखत होते अस्वस्थ वाटत होते त्यावेळी ते जागीच कोसळले व जवळच असलेल्या दगडावर आपटून त्यांच्या डोक्याला गंभीर अशी दुखापत झाली .त्याच माळरानावरून एक वाटसरू जात असताना त्याला ती व्यक्ती का पडली म्हणून तो जवळ जाऊन विचारपूस करू लागला विचारपूस करत असताना त्याला तो रुग्ण गंभीर अवस्थेत असल्यामुळे तो बोलू शकत नव्हता त्या वाटसरू ने त्या रुग्णास तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले परंतु ग्रामीण भाग असल्याने त्या रुग्णावर उपचार होऊ शकले नाही तो पर्यंत रुग्णाच्या नातेवाईकानी त्यास पिंपरी मधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले

 

  1. रुग्णालयात त्यास उपचारासाठी आणले असता त्या रुग्णाची स्थिती अत्यंत नाजूक होती वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या त्यावेळी रुग्णालया मधील डॉक्टरना निदान झाले तो आजार समजला त्यां रुग्णाच्या मेंदू मधील रक्तवाहिन्या गंभीर अशी इजा झाली होती त्यानुसार त्याच्यावर उपचार करण्याचा निर्णय रुग्णालयामधील डॉक्टरणी घेतला.बराच काळ उपचार करून ही तो रुग्ण कोमात गेला होता त्या रुग्णाची स्थिती गंभीर होती ते जगण्याचा शक्यता फक्त 1 % च राहिली होती त्यानुसार त्या रुग्णावर अवघड अश्या शस्त्रक्रिया करणे गरजेचं होतं ब्रेन ह्यामरेज ही अवघड शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते रुग्णाच्या कुटुंबीयाशी चर्चा करून ती अवघड शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला व त्या रुग्णावर त्वरित त्याचे आयुष्य वाचविणारी डी-काँप्रिन्सिव्ह ब्रेन सर्जरी म्हणजेच मेंदूची खुली शस्त्रक्रिया करण्यात आली ही शस्त्रक्रिया सुमारे चार तास सुरू राहिली व ती यशस्वी रित्या पार ही पडली ह्या अवघड अश्या शस्त्रक्रिये मधून यशस्वीपणे बाहेर पडले हा रुग्ण आठवडा भर व्हेंटिलेटरवर होता सुमारे तीन महिने तो आयसीयू मध्ये होता हा सर्व तीन महिन्याचा अवघड अश्या आजारातून सुखरूप असा बाहेर पडला आहे यामुळे त्या रुग्णाच्या नातेवाईकानी डॉक्टराचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *