शंकराचार्य जगद्गुरू श्री श्री विधुशेखर भारती यांचा भारत विजययात्रेत परळीतील सर्वपक्षीय नेते सहभागी

परळी –

आगामी लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष जोमाने काम करण्यास लागले असून याचाच प्रत्यय आज परळीत पाहावयास मिळाला आहे, एरवी पार्टी पार्टी च्या नावाने माळा जपणारे कार्यकर्ते मात्र आज धर्माच्या नावले पार्ट्या विसरून व आपसातील वयक्तिक मतभेद विसरून एका विजय यात्रेत सहभागी होण्यासाठी संमेलीत झाले.
हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्यपद असणार्‍या शंकराचार्य चार मुख्य पिठांपैकी शृंगेरी शारदा पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू प.पु. श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी हे भारत विजय यात्रेनिमित्त आज बारा ज्योतिर्लिंगां पैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळीत आले असून त्यांच्या हस्ते वैद्यनाथास निजलिंग स्वरुपात अभिषेक व आशिर्वचन देण्यासाठी आज परळीत आले असता त्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली .
श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी हे भारत विजय यात्रेनिमित्त संपूर्ण देशभर भ्रमण करत असून ते विविध धार्मिक क्षेत्रांना भेटी देत आहेत. त्या निमित्तांनी आज श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी हे प्रभु वैद्यनाथाला वेदोक्त पद्धतीने अभिषेक केला या धार्मिक पर्वणीचे साक्षीदार होण्यासाठी व दर्शनासाठी भाविक भक्त व नागरीकांनीं गर्दी केली आहे
बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या निजलिंग स्वरूपातील वेदोक्त अभिषेक महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले असून ठिकठिकाणी शंकराचार्य महास्वामीजींच्या जनकल्याणार्थ आयोजित विजययात्रेचे जोरदार स्वागत झाले आहे. परळीत पार्श्‍वभूमीवर यात्रेच्या स्वागताला मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी सर्व पक्षाचे नेते कार्यकते यांनी मिळून पदयात्रेत सहभाग दर्शवला या मध्ये राज्यच्या ग्रामविकास तथा महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे नेते अजय मुंडे ,बाजीराव धर्माधिकारी, सहअन्य कार्यकते,तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते व परळी पंचक्रोशीतील सर्व स्थरातील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे या मिरवणुकीत सर्व पक्ष्याचे कार्यकर्त्यांनी हजेरी लावून सहभाग दर्शविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *