पुलवामा घटनेच्या निषेधार्थ परळी शहर कडकडीत बंद

परळी(बीड):-

हिंदुस्थानी जवानांवर हल्ला करून पाकिस्तानने केलेल्या क्रूर कृत्याचा समस्त परळीकरांनी आपली दुकाने बंद करुन, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘जय जवान जय किसान’ अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून रॅली काढून तीव्र निषेध केला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी परळीकरांनी परिसर दणाणून सोडला. दरम्यान परळी पोलिसांनी सकाळी पथ संचलन केलं.

गुरूवारी पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने भ्याड हल्ला करून 44 हिंदुस्थानी जवानांचे प्राण घेतले. हा हल्ला संपूर्ण हिंदुस्थानवरील हल्ला होता, देशभरात या हल्ल्याचा तीव्र निषेध होत आहे. ‘एक के बदले दस मारेंगे, वीर जवानोंके लहू का बदला हम लेके रहेंगे’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘जय जवान जय किसान’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. पाकिस्तान विरूद्ध हिंदुस्थानने युद्ध पुकारावे, सैनिकांच्या खांदाला खांदा लावून परळीकर या युद्धात सहभागी होतील असे सांगितले.

पुलवामा येथे हिंदुस्थानी जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. पाकड्यांच्या या कृत्याविरोधात परळीत आज शनिवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी परळी बंद ठेवून तीव्र निषेध करण्यात आला. गुरुवारी पुलवाम्यात हिंदुस्थानी जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशाचे 44 जवान धारातीर्थी पडले. या घटनेचा परळीकरांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजसेवक, व्यापारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले हो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *