23 फेब्रुवारीला राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसची परळीत संयुक्त भव्य जाहिर सभा

परळी(बीड):– आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाची राज्यातील दुसरी संयुक्त जाहिर सभा शनिवार दि.23 फेब्रुवारी रोजी परळी शहरात होत असून, ही सभा ऐतिहासिक आणि न भूतो न भविष्यती व्हावी यासाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे तयारीला लागले असून, या सभेच्या तयारीसाठी आज शनिवार पासून त्यांनी परळी विधानसभा मतदार संघाचा झंझावती दौरा सुरू केला आहे. 

ना.मुंडे यांचे आज परळीत आगमन होताच, सकाळी त्यांनी नागापूर व सिरसाळा येथे कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. सायंकाळी त्यांनी पौळ पिंपरी गटाचीही बैठक घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या परिवर्तन यात्रेची सुरूवात रायगडावरून झाली आणि त्याचा समारोप परळीला होत आहे, ही परळीकरांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले. केवळ निवडणुका हा यात्रेचा उद्देश नव्हता तर राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि केंद्र व राज्यातील अपयशी सरकारचा पाढा जनतेसमोर मांडून परिवर्तनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन आम्ही या यात्रेच्या माध्यमातून केले. या यात्रेला संपुर्ण राज्यात अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला, आणि त्यावर आता कळस चढवण्याची जबाबदारी परळीकरांवर आली आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्यासह कॉंग्रेसचे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व बडे नेते परळी शहरात येणार असून, दोन्ही पक्षांच्या एकत्रिकरणाचा संदेश या सभेच्या माध्यमातून जाईल असा विश्‍वास धनंजय मुंडे यांनी या बैठकांमधून बोलताना व्यक्त केला.

बीड जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे, पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न आहे, हाताला काम नाही, शेतकर्‍यांना जाहिर केलेले कोणतेही अनुदान मिळत नाही, दुष्काळी मदत सरकारने आणखी दिली नाही, जनता चारी बाजुने त्रस्त असल्यामुळे सरकारला जाब विचारण्यासाठी होणार्‍या या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

नागापूर येथील झालेल्या बैठकीत सभापती मोहनराव सोळंके, तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, माजी उपसभापती विष्णुपंत देशमुख, भानुदास अप्पा डिघोळे, जिल्हा उपाध्यक्ष माऊली गडदे, सिरसाळा येथील बैठकीस ज्येष्ठ नेते एम.टी.नाना देशमुख, भाऊसाहेब नायबळ, जानिमियॉं कुरेशी, प्रभाकर पौळ, बाळु किरवले, प्रदिप खोसे, राजाभाऊ पौळ, संतोष पांडे, चंद्रकांत कराड, अक्रम पठाण, इम्रान पठाण, संजय जाधव, नितीन काकडे, भागवत कदम, राधाकिशन लहाने, नितीन निर्मळ, राजाभाऊ निर्मळ, राघुकाका मुठाळ तसेच विनायक राठोड, अरूण मुंडे, मोहन आबा मुंडे, यशवंत भोसले, बाळासाहेब मुंडे, प्रकाशराव कावळे, शिवाजी बप्पा सोळंके, पांडुरंग सातभाई आदींसह दोन्ही गटातील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *